शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात शेतकरी कामगार पक्षाने केली शेतमालाची होळी; शासनाच्या धोरणाचा निषेध

By atul.jaiswal | Updated: December 11, 2017 14:32 IST

अकोला : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्दे विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा साधला मुहूर्तआकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर पेटविला शेतमाल आकोट फैल पोलिसांनी पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यातआंदोलनात आगर-उगवा परिसरातील शेतकरी सहभागी झाले.

- अतुल जयस्वालअकोला : अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाकडून शेतकऱ्याला नागविण्याचेच काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी  घाम गाळून पिकविलेल्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात आगर, उगवा परिसरातील शेतकऱ्यांनी  सहभाग नोंदविला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता हे आंदोलन करण्यात आल्यामुळे आकोट फैल पोलिसांनी आंदोलकांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले.शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकविलेल्या मालास हमी भाव देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले असले, तरी त्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे त्याचा फायदाशेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. शासकीय खरेदी केंद्रे ही नुसती नावाचीच असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल नाईलाजाने व्यापाºयांना मिळेल त्या भावात विकावा लागतो. शासनाच्या या धोरणाचा फायदा केवळ मुठभर व्यापाºयांना होत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे धोरण तारक ठरण्याऐवजी मारकच ठरत आहे. शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाचे मात्र याकडे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप करीत शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदिप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस भाई दिनेश काठोके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात आगर-उगवा परिसरातील शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी बैलगाडीतून सोयाबीन, ज्वारी, ओवा, तिळ, मूग, कापूस, तूर, हरभरा आदी शेतमाल भर रस्त्यावर टाकून तो पेटवून दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. रस्त्यात शेतमालाची होळी केल्याने वाहतुक अवरुद्ध होणार नाही, याची काळजीही आंदोलकांनी यावेळी घेतली.आंदोलकांवर स्थानबद्धतेची कारवाईअकोला-आकोट मार्गावर आंदोलन सुरु असताना आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना त्यांचे आंदोलन थांबविण्याची विनंती केली. यावेळी पोलिसांनी भाई प्रदिप देशमुख, भाई दिनेश काठोके, श्रीकृष्ण ढगे, संतोष देशमुख, प्रविण कराळे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.शेतकरी मोठ्या मेहनतीने उन्हा-तान्हात राबून शेती पिकवितो. त्याने पिकविलेल्या मालास मात्र बाजारात कवडीमोल भाव मिळतो. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत असल्यामुळे आम्ही शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शेतमालाची होळी केली.

- प्रदिप देशमुख, राज्य चिटणीस मंडळ सदस्य, शेकाप

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरीagitationआंदोलन