विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:55 IST2021-01-08T04:55:20+5:302021-01-08T04:55:20+5:30
पणज : झाडाच्या फांद्या तोडत असताना शेतकऱ्याचा शॉॅक लागून मृत्यू झाल्याची घटना येथील बोर्डी नदीवरील पुलानजीक सोमवारी दुपारच्या सुमारास ...

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
पणज : झाडाच्या फांद्या तोडत असताना शेतकऱ्याचा शॉॅक लागून मृत्यू झाल्याची घटना येथील बोर्डी नदीवरील पुलानजीक सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत शेतकऱ्याचे पांडुरंग रामराव राऊत (६०) असे नाव आहे.
अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील शेतकरी पांडुरंग रामराव राऊत हे गावानजीक असलेल्या बोर्डी नदीवरील पुलाजवळ धुऱ्यावरील झाडाच्या फांद्या तोडत होते. याच झाडाला ११ के. व्ही.च्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. फांद्या तोडत असताना शेतकरी पांडुरंग राऊत यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेचा पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.