मनात्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:30 IST2020-12-05T04:30:43+5:302020-12-05T04:30:43+5:30
दत्ता मनतकार हे घरून काही न सांगता निघून गेले होते. त्यांचा शोधाशोध घेतला असता त्यांनी निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे ...

मनात्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या
दत्ता मनतकार हे घरून काही न सांगता निघून गेले होते. त्यांचा शोधाशोध घेतला असता त्यांनी निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर घटनेचा गजानन राठोड व बागूल मेजर यांनी पंचनामा केला. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सततची नापिकी व कर्जाचा डोंगर असल्यामुळे दत्ता मनतकार यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.