चतारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:55+5:302021-05-09T04:19:55+5:30
पातूर तालुक्यातील चतारी येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन सखाराम खंडारे हे शुक्रवारी दुपारी शेतात गेले असता त्यांनी शेतात फवारणीसाठी ठेवलेले ...

चतारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
पातूर तालुक्यातील चतारी येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन सखाराम खंडारे हे शुक्रवारी दुपारी शेतात गेले असता त्यांनी शेतात फवारणीसाठी ठेवलेले विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्याच्या शेजारी असलेल्या शेतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मोहन खंडारे यांना चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र खंडारे हे गंभीर झाल्याने त्यांच्यावर चतारी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मोहन खंडारे यांना अकोला येथे उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मोहन खंडारे यांच्याकडे दोन एकर शेती असून, या शेतावर त्यांनी बँकेचे कर्ज घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. (फोटो)