शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 17:46 IST

सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसखाराम गंगाराम बहाकार (५५) या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. सखाराम बहाकर याच्या नावाने चोहोगाव शेतशिवारात सव्वा एकर शेतजमीन असून त्यावर जिल्हा बँकेच्या धाबा शाखेचे पीककर्ज आहे.

सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विविध संकटाच्या चक्रव्युहात गुरफटून गेल्याने मागील महिनाभरात चोहोगावमधील तीन शेतकºयांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे चोहोगाव हादरून गेले आहे.नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या सखाराम गंगाराम बहाकार (५५) या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. सखाराम बहाकार यांनी ‘बटाई’ पद्धतीने पेरलेल्या भाजीपाल्याच्या शेतातच दोन दिवसांपुर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. सखाराम बहाकर याच्या नावाने चोहोगाव शेतशिवारात सव्वा एकर शेतजमीन असून त्यावर जिल्हा बँकेच्या धाबा शाखेचे पीककर्ज आहे. यासह तीन मुलींच्या लग्नासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले खाजगी कर्जही आहे. चार वर्षापासून शेतात उत्पादन झाले नाही. शेती तोट्यात करण्याची वेळ आली. त्यामुळे बहाकर यांनी यंदा दुसºयाच्या शेतात बटाईने भाजीपाला पेरला होता. त्यांचा मुलगा शाळेतून आल्यावर गावात भाजीपाला विकायचा. इतकेच नव्हे तर शेतातून रखवाली करून घरी आल्यावर सखारामही सकाळी व सायंकाळी भाजीपाला विकायचा. तथापि , कवडीमोल भावामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या चिंतेतच सखाराम बहाकर यांनी शेतातच कीटकनाशक घेतले.

२५ एप्रिलला ठरले रुपालीचे लग्नसखाराम बहाकर यांची मुलगी रुपालीचे २५ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. लग्न घरीच असल्यामुळे त्याचे नियोजन व इतर खर्चाची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंतासुद्धा त्यांना लागली होती. यापूर्वी तीन मुलींची लग्ने केली. त्याचे कर्ज अजूनही फिटली नाहीत. तोच शेवटच्या मुलीचे लग्न बार्शीटाकळी तालुक्यातील वस्तापूर (वाघा) येथील छगन उत्तम येवले यांच्यासोबत ठरले आहे. आता सखाराम यांच्या मृत्युमुळे या लग्नाची जबाबदारी पत्नी व एकुलत्या एक मुलावर आहे.

चार वर्षापूर्वी भावानेही केली होती आत्महत्याचार वर्षापूर्वी सखाराम बहाकर यांचे भाऊ गजानन गंगाराम बहाकर या अल्पभूधारक शेतकऱ्यानेसुद्धा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती.

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या