शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला व वाशिम जिल्ह्यातील २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३२०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:47 IST

अकोला व वाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देसंबंधित शेतकºयांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. याद्यांची तपासणी करून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००९ पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोलावाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सन २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय गतवर्षी जूनमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००८ मध्ये केंद्र शासनाच्या कर्जमाफी योजनेत आणि सन २००९ मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्र्जमाफी योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांंना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ९ मे २०१८ रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार सन २००९ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकºयांपैकी १ आॅगस्टपर्यंत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या संबंधित शेतकºयांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. याद्यांची तपासणी करून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सन २००८ व २००९ च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकºयांना कर्जमाफी मिळाला नाही, अशा सन २००१ ते २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या ३ हजार २०० शेतकºयांच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमFarmerशेतकरी