वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान!

By Admin | Updated: August 2, 2016 16:58 IST2016-08-02T16:02:08+5:302016-08-02T16:58:03+5:30

भारत-पाकीस्तान सीमेवरील वाघा बॉर्डरवरील परेडमध्ये महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकार तथा पुसद येथील रहिवासी बाबुराव महाराज तडसे यांना धावण्याचा बहुमान प्राप्त झाला

The famous Kirtankar Tadsay Maharaj is proud to run in the Wagah Border Parade! | वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान!

वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान!

नंदकिशोर नारे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २ -  वाशिम येथील उद्योजक तरणजीतसिंग सेठी मित्रमंडळ २५ जुलै रोजी भारत भ्रमणासाठी गेले आहेत. यामध्ये जवळपपास २५ ते ३० जणांचा समावेश असून १ आॅगस्ट रोजी भारत-पाकीस्तान सिमेवरील वाघा बॉर्डरवरील परेडमध्ये महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकार तथा पुसद येथील रहिवासी बाबुराव महाराज तडसे यांना धावण्याचा बहुमान प्राप्त झाला. 
वाशिम परिसरातील २५ ते ३० भाविक तरणजितसिंग सेठी यांनी मोफत आयोजित केलेल्या या यात्रेत सहभागी आहेत. भारत भ्रमण करीत असतांना त्यांनी जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अमृतसर, वाघा बॉर्डर, दिल्लीसह विविध स्थळी भेटी दिल्यात. १ आॅगस्ट रोजी तरणजित सेठी मित्र मंडळ वाघा बॉर्डर असतांना तेथे भारतीय जवानांतर्फे हातात तिरंगा घेवून परेडसाठी ८ ते १० भारतीयांची निवड केल्या जाते. यामध्ये दोन महिला, दोन पुरुष व बालकांचा समावेश असतो. यावेळी येथे बसलेले पुसद येथील तडसे महाराज यांची जवानांनी निवड केली त्यावेळी ते मोठया उत्साहाने व भारत माता की जय च्या घोषणा देत धावले.
 
 
 

Web Title: The famous Kirtankar Tadsay Maharaj is proud to run in the Wagah Border Parade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.