आज मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:11+5:302021-02-06T04:33:11+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद दौऱ्याचे आयोजन येथील भगवंत लॉन येथे ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ...

Family dialogue of Murtijapur NCP today | आज मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद

आज मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार संवाद

मूर्तिजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद दौऱ्याचे आयोजन येथील भगवंत लॉन येथे ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील, गृहमंत्री ना.अनिल देशमुख, संपर्कमंत्री ना. राजेंद्र शिंगणे महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रीमती रूपालीताई चाकणकर, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आ. अमोल मिटकरी, माजी आमदार गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बीडकर, माजी आमदार हरिदासजी भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, संतोष कोरपे, माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव रवी राठी, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल श्रीकृष्ण बोळे, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक निजामभाई इंजिनिअर ,जिल्हाध्यक्ष महिला उज्वलाताई राऊत, जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला सुषमाताई कावरे, जिल्हाध्यक्ष भटके-विमुक्त जाती-जमाती सेलचे गणेशराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्व फ्रंटच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष सागरभाऊ कोरडे, जगदीश मारोटकर, सतीश पाटील गावंडे, राम कोरडे, अयाज खान यांनी केले आहे.

Web Title: Family dialogue of Murtijapur NCP today