अकोल्यातील कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:56 IST2018-08-13T14:53:02+5:302018-08-13T14:56:17+5:30

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झाले आहेत.

Family of Akola, will self-immolation Red Fort in Delhi | अकोल्यातील कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार 

अकोल्यातील कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार 

ठळक मुद्दे तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केली, त्या द्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल याला न देता हडप केली. मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही.

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झाले आहेत.
गोपाल अग्रवाल मध्यवर्ती बस स्थानकासमोर विविध प्रकाशित वृत्तपत्रे विक्री करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. याला जोड म्हणून त्यांनी मागील वर्षी मित्रांसोबत ठेक्याने भाड्याची शेती केली होती. त्यामध्ये आलेले तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केली, त्या द्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल याला न देता हडप केली. ती रक्कम मागणी केली असता, पूर्वीच्या मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावर जुने शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी थातूरमातूर चौकशी करीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही. म्हणून गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात न्याय मागितला. मात्र, न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करणार असल्याचे पत्र पंतप्रधानांना दिले असून, त्यानुसार आत्मदहन करण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

 

Web Title: Family of Akola, will self-immolation Red Fort in Delhi