तापमानात घसरण!
By Admin | Updated: January 8, 2015 00:52 IST2015-01-08T00:52:04+5:302015-01-08T00:52:04+5:30
अकोल्याचे किमान तापमान आले १0.१ अंशावर.

तापमानात घसरण!
अकोला : अवकाळी पावसाचे ढग निवळताच पुन्हा थंडी वाढली असून, किमान तापमानासह कमाल तापमानातही घसरण झाल्याने दिवसाही गारवा जाणूव लागला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ८.८ अंश किमान तापमानाची नोंद केली असून अकोला शहरात असलेल्या हवामान विभागातर्फे १0.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत जिल्हय़ात अवकाळी पावसाने हजेरी लावली, या दरम्यान ढगाळ वातावरण असल्याने कडाक्याच्या थंडीतून नागरिकांची सुटका झाली होती. ढगाळ वातावरण निवळताच मात्र थंडीचा जोर वाढला असून, किमान तापमानासह कमाल तापमानातही घसरण झाली आहे.