इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 02:37 IST2017-03-04T02:37:19+5:302017-03-04T02:37:19+5:30

अकोला एमआयडीसीतील घटना.

Falling from the building, the death of the laborer | इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

अकोला, दि. ३- औद्योगिक वसाहत क्रमांक ४ मधील एका मजुराचा इमारतीवरून कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली नव्हती.
छत्तीसगडमधील रहिवासी असलेला दिनेश कुमार नामक इसम एमआयडीसीतील फेज क्रमांक ४ मधील एका मिलमध्ये कामाला आहे. दिनेश हा शुक्रवारी रात्री काम करीत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तातडीने सवरेपचार रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दिनेशचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत नोंद घेतली नसल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Falling from the building, the death of the laborer