पाण्याच्या नासाडीवर मीटरचा उतारा

By Admin | Updated: April 23, 2016 02:25 IST2016-04-23T02:25:25+5:302016-04-23T02:25:25+5:30

नळांना बसवणार मीटर; मनपा आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती.

Extraction of water meter | पाण्याच्या नासाडीवर मीटरचा उतारा

पाण्याच्या नासाडीवर मीटरचा उतारा

अकोला: नळांना तोट्या नसल्यामुळे धो-धो वाहणार्‍या पाण्याची नासाडी रोखून मानवनिर्मित पाणीटंचाईला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या २५ एप्रिल (सोमवार)पासून शहरात अवैध नळ कनेक्शन वैध करण्यासह नळांना मीटर बसवण्यासाठी धडक मोहीम सुरू करणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिली. मनपा प्रशासनाकडून अकोलेकरांना पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. सद्यस्थितीत पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करत प्रशासनाने नागरिकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयुक्त अजय लहाने यांनी दिली. जलप्रदाय विभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत आलेले कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी कालांतराने जलकुंभनिहाय पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयोग राबवला. जलवाहिन्यांना गळती लागत असल्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र नित्याचेच झाले होते.

Web Title: Extraction of water meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.