शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन; ट्रॅक्टर मालकांना चार लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 20:23 IST

बोरगाव वैराळे (अकोला): पूर्णा नदीपात्रातून लिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्‍या चार ट्रॅक्टर मालकांना शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी १२ फेब्रुवारी रोजी दिले. 

ठळक मुद्देलिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खननचार ट्रॅक्टर मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड 

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे (अकोला): पूर्णा नदीपात्रातून लिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्‍या चार ट्रॅक्टर मालकांना शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी १२ फेब्रुवारी रोजी दिले. २६ जानेवारी रोजी पहाटे वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. हे ट्रॅक्टर लिलाव न झालेल्या हाता येथील पूर्णा नदीपात्रातून मागील आठ दिवसांपासून रात्री १0 वाजताच्या नंतर दररोज वाळूची चोरी करीत असल्याची माहिती हाता सरपंच दामोदर यांनी बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांना दिली होती.  तहसीलदार पुंडे यांनी मंडळ अधिकारी ए. एम. मेश्राम, तलाठी डी. एस. काळे, सतीश कराड, कोतवाल राजीव डाबेराव यांचे पथक नेमून लिलाव न झालेल्या घाटावर गस्त घालण्याचे आदेश दिले होते. या पथकाला चोरीची रेती वाहतूक करताना एमएच २८ बी २२१७, एमएच ३0 जे ४0७१, एमएच ३0 एबी ५७१७, एमएच ३0 एबी ६५३३ हे चार ट्रॅक्टर आढळले होते. या चार ट्रॅक्टरधारक कौसकार, गावंडे, कुचके व दामोदर यांना बाळापूरचे उपविभागीय अधिकारी मोहिते यांनी शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार प्रतिट्रॅक्टरला चोरीची वाळू वाहतूक केली म्हणून एक लाख रुपये दंड करण्याचे आदेश १२ फेब्रुवारी रोजी काढले आहेत. त्यामुळे या चारही वाहनधारकांना बाळापूर तहसील कार्यालयात चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. या चार ट्रॅक्टरधारकांकडून नवीन परिपत्रकानुसार एक लाख रुपयाप्रमाणे दंड वसूल होणार असल्यामुळे वाळू चोरी करणार्‍या वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत. 

बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, अंदुरा, हाता, सागद हे वाळू घाट अद्याप हर्रास झालेले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी करणार्‍यांचे फावले होते; मात्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार एक लाखापेक्षा जास्त दंड होण्याच्या निर्णयामुळे वाळू चोरी करणार्‍यांवर वचक निर्माण झाला आहे.- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण