पाण्याच्या थंड बाटलीसाठी जादा पैसे आकारणे सुरूच!
By Admin | Updated: April 17, 2015 01:52 IST2015-04-17T01:52:36+5:302015-04-17T01:52:36+5:30
स्टिंग ऑपरेशन; ग्राहकांची लूट, १८ रुपयांच्या बाटलीची २0 रुपयांमध्ये सर्रास विक्री.

पाण्याच्या थंड बाटलीसाठी जादा पैसे आकारणे सुरूच!
अकोला: पाण्याच्या थंड बाटलीसाठी अधिकतर मुल्यापेक्षा (एमआरपीपेक्षा) जास्त मुल्य आकारले जाऊ नये, असा आदेश वैधमापन विभागाने दिला असतानाही बाटलीतील पाणी थंड करण्याच्या नावाखाली २ रुपये अधिक आकारण्याचा प्रकार अकोला शहरात सर्रास सुरू आहे. अकोला शहरात हजारो लीटर बाटल्या दरोराज विकल्या जाता त. त्यातून शीतल जलाच्या नावाखाली सुरू असलेला हा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने गुरुवारी ह्यस्टिंग ऑपरेशनह्णच्या माध्यमा तून उजेडात आणला. पाणीटंचाई तसेच अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार लक्षात घेता, स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी म्हणून, विविध कं पन्यांच्या बाटलीमधील पाण्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानांवर विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. अलीकडच्या काळात शुद्ध आणि शीतजल म्हणून तहान भागविण्यासाठी ह्यसीलबंदह्ण बाटलीमधील पाण्याच्या वापरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. जीवाची लाही-लाही करणार्या तापत्या उन्हाच्या दिवसात तर थंड पाण्याची बाटली विकत घेऊन, तहान भागविणार्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांकडून पिण्याच्या पाण्यासाठी विविध कंपन्यांच्या थंड पाण्याच्या बाटलीची ग्राहकांकडून होणार्या मागणीतही वाढ झाली आहे. ग्राहकांची गरज आणि मागणीचा फायदा घेत, 'शीतजल' विक्रेत्यांकडून मात्र थंड पाणी बाटलीच्या विक्रीत १८ रुपयांची पाण्याची बाटली २0 रुपयांमध्ये ग्राहकांना विकून, त्यामधून माया जमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे
. .. असे आढळून आले वास्तव!
लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गुरुवारी दुपारी ३ वाजता अकोल्यातील गांधी रोडस्थित एका रेस्टॉरंटमध्ये थंड पाणी आणि कोल्ड्रिंक्स घेतले. यावेळी १८ रुपये किमतीच्या थंड पाण्याच्या बाटलीचे विक्रेत्यांकडून २0 रुपये घेण्यात आले व दिलेल्या बिलावरही थंड पाण्याच्या बाटलीपोटी २0 रुपये किंमत आकारल्याचे विक्रेत्याकडून देण्यात आलेल्या बिलात नमूद करण्यात आले. सायंकाळी ५.४५ वाजता शहरातील जुना भाजी बाजार रोडस्थित एका रेस्टॉरंटमध्ये अल्पोपाहार करून, थंड पाण्याची बाटली घेतली असता, १८ रुपये किमतीच्या थंड पाणी बाटलीचे २0 रुपये देयकात आकारण्यात आले.
बाटलीची किंमत नमूद न करताच दिले बिल!
शहरातील जुना बाजारस्थित एका रेस्टॉरंटमध्ये केलेल्या अल्पोपाहार आणि थंड पाण्याच्या बाटलीपोटी विक्रेत्याकडून एकूण १८0 रुपयांचे बिल देण्यात आले. त्यामध्ये बिलावर थंड पाण्याच्या बाटलीची किंमत नमूद करण्याचा आग्रह विक्रेत्याकडे धरला; मात्र त्याला बगल देत बिलावर पाण्याच्या बाटलीच्या किमतीची रक्कम नमूद न करताच विक्रेत्याने सरसकट १८0 रुपयांचे बिल दिले.