शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

By atul.jaiswal | Updated: June 1, 2022 11:00 IST

Extension till June 30 for issuance of ST smart card : सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलत पात्र प्रवाशांना अनिवार्य करण्यात आलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार आहे. महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने आतापर्यंत स्मार्ट कार्ड न काढता आलेल्या हजारो सवलतधारकांना दिलासा मिळाला आहे. १ जुलै २०२२पासून मात्र स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, पत्रकार यांच्यासह जवळपास २९ समाज घटकांना एसटीच्या प्रवासात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मे २०२२ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. परंतु, हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत. परिणामी सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

३० जूनपर्यंत प्रचलित ओळखपत्रे ग्राह्य

सध्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रचलित ओळखपत्रांच्या आधारे एसटीत प्रवासाच्या सवलतीचा लाभ दिला जात आहे. ही प्रचलित ओळखपत्रे ३० जूनपर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. दि. १ जुलैपासून मात्र ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत. स्मार्ट कार्ड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला