ओखा-मदुरै विशेष एक्स्प्रेसला सहा महिन्यांची मुदतवाढ

By Atul.jaiswal | Published: June 23, 2024 02:11 PM2024-06-23T14:11:49+5:302024-06-23T14:12:07+5:30

रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २४ जूनपर्यंत अधिसूचीत असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे.

Extension of Okha-Madurai Special Express by six months | ओखा-मदुरै विशेष एक्स्प्रेसला सहा महिन्यांची मुदतवाढ

ओखा-मदुरै विशेष एक्स्प्रेसला सहा महिन्यांची मुदतवाढ

अकोला : प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै-ओखा विशेष एक्स्प्रेसला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता ३ जानेवारी २०२५पर्यंत धावणार असून, या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २४ जूनपर्यंत अधिसूचीत असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दर मंगळवारी २२:१५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात २८ जूनपर्यंत अधिसुचीत असलेली ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३ जानेवारी २०२५ पर्यंत दर शुक्रवारी १:१५ वाजता स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी १० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

राजकोट-जडचर्ला विशेष सप्टेंबरअखेरपर्यंत धावणार

 २४ जूनपर्यंत अधिसूचीत असलेली ०९५७५ राजकोट-जडचर्ला साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस आता ३० सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी राजकोट येथून दुपारी १३:४५ वाजता रवाना होऊन जडचर्ला येथे दुसऱ्या दिवशी मंगळवारी १९:३५ वाजता जडचर्ला येथे पोहोचणार आहे.  परतीच्या प्रवासात ०९५७६ जडचर्ला-राजकोट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १ ऑक्टोबरपर्यंत दर मंगळवारी जडचर्ला येथून २१:३५ वाजता रवाना होऊन गुरुवारी ०५:०० वाजता राजकोट स्थानकावर पोहोचणार आहे.

Web Title: Extension of Okha-Madurai Special Express by six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.