‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यास मुदतवाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST2021-03-21T04:17:50+5:302021-03-21T04:17:50+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विना अनुदानीत शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के जागा वंचित व ...

‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यास मुदतवाढ!
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विना अनुदानीत शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुषंगाने दरवर्षीप्रमाणे २०२१.....२२ या वर्षासाठी २५ टक्के ‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येत आहे.या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘आरटीइ’अंतर्गत पात्र असलेल्या ९ हजार ४३२ शाळांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. २०२१....२२ या वर्षीच्या ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्याकरिता २१ मार्च २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू गत ११ ते १५ मार्च या कालावधीत ‘ओटीपी’च्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांना अर्ज भरता आले नाही.तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘लाॅकडाऊन ’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे २५ टक्के ‘आरटीइ’ प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्याकरिता ३० मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश राज्याच्या शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथिमक) द.मो.जगताप यांनी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मार्च रोजी दिला. त्यामुळे ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यत अर्ज करण्यासाठी पालकांचा मार्ग मोकळा झाला आहे.