शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

युवकाकडून अल्पवयीन मुलीचे शोषण; मुलीला गर्भधारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 6:22 PM

अकोला: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला.

अकोला: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. रामदासपेठ पोलिसांनी आरोपी युवकाला गजाआड करून त्याची २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पूर्वी हनुमान बस्ती भागात राहायची. तिच्या घराजवळ राहणारा आरोपी शुभम रमेश डहाके (२४ रा. हनुमान बस्ती) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून शुभमने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला घराजवळीलच एका खोली बोलावून तिच्यासोबत लगट करायचा. मुलीने त्याला विरोध केला; परंतु त्याने बळजबरीने तिचे लैंगिक शोषण केले. यानंतरही त्याने सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी तिने पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने तिला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्यावर आईला धक्काच बसला. आईने विचारणा केल्यावर मुलीने शुभम डहाके याने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याची आपबिती कथन केली. बालकल्याण समितीने मुलीचा जबाब नोंदविल्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी शुभम रमेश डहाके याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(आय)(एन), पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार