‘स्कीम’च्या नावाखाली मुदतबाहय़ मसाले ग्राहकांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 01:55 IST2016-07-25T01:55:49+5:302016-07-25T01:55:49+5:30
जुने शहरातील काही ठिकाणासह तालुक्यात सर्रास विक्री.

‘स्कीम’च्या नावाखाली मुदतबाहय़ मसाले ग्राहकांच्या माथी
सचिन राऊत /अकोला
किराणा दुकानातून विकण्यात येत असलेले पॅकिंगमधील मसाले आणि या प्रकारचे खाद्यपदार्थ मुदतबाहय़ झाल्यानंतर स्कीमच्या नावाखाली सर्रास ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. जुने शहरातील काही भाग आणि तालुक्याच्या ठिकाणी असे प्रकार समोर येत आहेत.
राज्यातील विविध कंपन्यांनी पॅकिंगमध्ये मसाले विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पॅकिंगमध्ये असलेले सदरचे मसाले मुदतबाहय़ झाल्यानंतर ते खाद्यपदार्थ पडलेल्या भावात किराणा दुकानदारांना ह्यस्कीमह्णच्या नावाखाली विक्री करण्यात येतात. त्यानंतर किराणा दुकानदार मुदतबाहय़ खाद्यपदार्थ व मसाल्यांची ग्राहकांच्या डोळयात धूळफेक करून विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. जुने शहरातील जय हिंद चौकात असलेल्या एका दुकानातून व्हेज मिक्स असलेले पॅकिंगमधील मसाले मुदतबाहय़ असतानाही विक्री करण्यात आले. या मसाल्याचे देयक मागितले असता किराणा दुकानदाराने देयक देण्यात येत नसल्याचे स्पष्ट सांगितले.
किराणा दुकानांमधून देयक देण्यात येत नसल्याने याचाच फायदा घेत ग्राहकांना मुदतबाहय़ खाद्यपदार्थ सर्रास विक्री करण्यात येत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचेही दुर्लक्ष असून, त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अशाप्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणार्यांचे चांगलेच फावले आहे.