माेटरवाहन विभागात भंगार वाहनांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:18+5:302021-07-10T04:14:18+5:30
विद्युत साहित्याची जाेडणी करा ! अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन विद्युत साहित्य लावण्यात येणार ...

माेटरवाहन विभागात भंगार वाहनांचा खच
विद्युत साहित्याची जाेडणी करा !
अकाेला : महापालिका कार्यालयातील जुने विद्युत साहित्य काढून त्याऐवजी नवीन विद्युत साहित्य लावण्यात येणार आहे. नवीन साहित्यामुळे विद्युत देयकांत बचत हाेणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, नवीन साहित्य दाखल झाले असले तरी त्याची जाेडणी अतिशय संथगतीने हाेत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून हाेत आहे.
मुख्य नाली बुजविली !
अकाेला : उमरी परिसरातील मुख्य मार्गावरील पेट्राेल पंपासमाेर मुख्य नाली बुजविण्यात आल्यामुळे परिसरातील रेस्टाॅरंट, रहिवासी इमारतींमधील सांडपाणी रस्त्यात साचत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरून महापाैर अर्चना मसने दरराेज ये - जा करतात. मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे या समस्येकडे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप स्थानिकांनी केला आहे.
शाळेच्या आवारात अतिक्रमण
अकाेला : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या रतनलाल प्लाॅट चाैकातील उर्दू शाळेच्या आवारात स्थानिक रहिवाशांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण उभारल्याचे समाेर आले आहे. व्यावसायिक उद्देशातून भंगार साहित्याचे पाेते या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मालमत्तेला लावले कुलूप
अकाेला : पश्चिम क्षेत्रातील वाशिम रोड येथील विनय आईल इंडस्ट्रीज गट क्रं. बी-१४, मालमता क्रं. १७८९ यांच्याकडे सन २०१८-१९ ते चालू वर्षापर्यंत २ लाख ८० हजार ५०७ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. संबंधित मालमत्ता धारकाला नाेटीस बजावूनही कर जमा न केल्याने शुक्रवारी मनपाच्यावतीने मालमत्तेला सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.