शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

काेराेना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी १६ लाख रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:11 AM

Akola News : ५८२ मृतदेहांपैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असता यासाठी मृतांच्या नातेवाइकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़.

ठळक मुद्देविद्यूत दाहिनीचा प्रस्ताव महापालिकेत धुळखात
- आशिष गावंडेअकाेला : शहरात गत वर्षभरापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूची लागण हाेऊन मृत्यू झालेल्या ५८२ मृतदेहांपैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असता यासाठी मृतांच्या नातेवाइकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़. काेराेनाचा अनिश्चित कालावधी लक्षात घेता मृतांच्या नातेवाईकांचा वेळ वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाने विद्युत दाहिनीचा अवलंब करण्याची गरज असताना मनपात विद्युत दाहिनीचा प्रस्ताव धूळखात पडून असल्याची माहिती समाेर आली आहे़.मागील वर्षभरापासून काेराेना विषाणूची लागण झाल्यामुळे आजवर अनेक तरुण व वयाेवृध्द नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेकांच्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे़ अनेक निष्पाप लहान मुलांच्या डाेक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे़ जिल्ह्यात काेराेनाचा पहिला पाॅझिटिव्ह रुग्ण ७ एप्रिल २०२० राेजी मनपा क्षेत्रातील बैदपुरा परिसरात आढळून आला हाेता़. त्यानंतर काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली हाेती. काेराेनाची पहिली लाट जून महिन्यापासून ओसरताच नागरिकांनी माेठ्या धुमधडाक्यात लग्न साेहळे व विविध कार्यक्रम साजरे केले़ त्याचे परिणाम जानेवारी महिन्याच्या अखेरनंतर समाेर आले़ फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांच्या संख्येत माेठी वाढ झाल्याचे चित्र हाेते़ एकूणच, गतवर्षभरापासून ते मे महिन्याच्या कालावधीपर्यंत शहरात तब्बल ५८२ जणांचा मृत्यू झाला़ यापैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर उर्वरित ११३ मृतदेहांना दफन करण्यात आले़.अंत्यंसंस्कारासाठी ३ हजार ५०० रुपये खर्चअंत्यसंस्काराच्या साहित्यासाठी काही स्मशानभूमीत ३ हजार ९०० रुपये तर काही स्मशानभूमीत ३ हजार ५०० रुपये माेजावे लागले़ यासाठी आजवर मृतांच्या नातेवाईकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़.विद्युत दाहिनीसाठी ५५ लाखांचा खर्चकाेराेनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासनाने विद्युत दाहिनीचा प्रस्ताव तयार केला़. विद्युतद्वारे भस्मीकरण करणारी दाहिनी ४५ लाख रुपयांपर्यंत असून एलपीजीवर क्रियाशील हाेणाऱ्या दाहिनीसाठी ४७ लाख रुपये माेजावे लागतील़ जीएसटी तसेच इतर कर व दाहिनी बसविण्यासाठी ५५ ते ५८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़.एलपीजी दाहिनीसाठी कमी शुल्कविद्युत व एलपीजीवर आधारित दाहिनीमध्ये ४५ ते ५० मिनिटात मृतदेहाची राख हाेते़ एलपीजी दाहिनीचा वापर केल्यास नागरिकांना १५०० ते १८०० रुपये शुल्क अदा करावे लागेल़. त्या तुलनेत विद्युत वाहिनीसाठी विजेचा जास्त वापर हाेणार असल्याने किमान तीन ते साडेतीन हजार रुपये शुल्क द्यावे लागेल़. मनपाने या प्रस्तावावर सखाेल चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे़.
टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या