तीन लाख शेतक-यांना पीक विम्याची अपेक्षा !
By Admin | Updated: November 24, 2014 00:41 IST2014-11-24T00:40:50+5:302014-11-24T00:41:48+5:30
पश्चिम व-हाड : सरासरी ४२.५0 पैसे आणेवारी.
_ns.jpg)
तीन लाख शेतक-यांना पीक विम्याची अपेक्षा !
ब्रह्मनंद जाधव मेहकर (बुलडाणा)
पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगाम पश्चिम वर्हाडातील शेतकर्यांच्या हातून निघून गेला. पश्चिम वर्हाडाची पीक आणेवारी ४२.५0 पैसे निघाली असून आणेवारीने शेतकर्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सुमारे ३ लाख शेतकर्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिलत पावसाने सुरूवातीपासून दडी मारल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला. रब्बी हंगामाची स्थितीही चांगली नाही. पावसाअभावी या भागावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, महसूल विभागाच्या आणेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुधारित आणेवारीमुळे शेतकर्यांना दुष्काळसदृश स्थितीतील निकषांनुसार लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा-करमाफी, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत आदी सवलती दिल्या जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ३ लाख ६ हजार ६८१ शेतकर्यांनी २ लाख ८0 हजार ३२४ हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला आहे. त्यासाठी सुमारे १0 कोटी २६ लाख ७७ हजार रुपयांचा पीक विम्याचा हप्ता शेतकर्यांनी भरला आहे. अकोला जिलची पीक आणेवारी ४१ पैसे असून, या जिलतील ६७ हजार १४ शेतकर्यांनी ७६ हजार ८0२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. त्याचा २ कोटी ८७ लाख ३४ हजार रुपये हप्ता शेतकर्यांनी भरला. बुलडाणा जिलची पीक आणेवारी ४२ पैसे असून, १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता भरला. वाशिम जिलची पीक आणेवारी ४४.५0 पैसे निघाली असून, ६४ हजार २५१ शेतकर्यांनी ७४ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. त्यासाठी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपये विम्याचा हप्ता भरण्यात आला.