निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे मार्गी लावण्याची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:32 PM2019-09-01T16:32:09+5:302019-09-01T16:32:15+5:30

संबंधित यंत्रणांकडून विकास कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्याची लगबग वाढली आहे.

Expansion of development works in the face of elections! | निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे मार्गी लावण्याची लगबग!

निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे मार्गी लावण्याची लगबग!

Next

- संतोष येलकर
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर विविध विकास कामे मार्गी लावण्याची लगबग यंत्रणांकडून सुरू झाली असून, विकास कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्यात येत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विकास कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात मंजूर असलेली विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी कामांचे प्रस्ताव तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर असलेल्या विविध विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून विकास कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्याची लगबग वाढली आहे.

१५९ कोटींचा निधी मंजूर; अशी आहेत प्रस्तावित कामे!
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते, इतर जिल्हा मार्ग, जनसुविधा अंतर्गत कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे, मृद व जलसंधारण, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत विकास कामे, नगरोत्थान योजनेंतर्गत कामे, प्राथमिक शाळा इमारतींची बांधकामे, प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र इमारतींचे बांधकाम व देखभाल-दुरुस्ती, अंगणवाडीची बांधकामे, यात्रा स्थळांचा विकास, ऊर्जा विकास व इतर विकास कामे प्रस्तावित आहेत.

१६.८६ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता!
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात जिल्ह्यात विविध योजना आणि विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मंजूर निधीपैकी विविध यंत्रणांकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ३१ आॅगस्टपर्यंत १६ कोटी ८६ लाख ५४ हजार रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

 

Web Title: Expansion of development works in the face of elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला