पहिला दिवस उत्साहाचा, आता वाढली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST2021-01-21T04:17:53+5:302021-01-21T04:17:53+5:30

१९ टक्क्यांनी कमी झाले लसीकरण पहिल्या दिवशी जिलह्यात ७९.३३ टक्के कोविड लसीकरण झाले होते. त्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० ...

Excitement for the first day | पहिला दिवस उत्साहाचा, आता वाढली धाकधूक!

पहिला दिवस उत्साहाचा, आता वाढली धाकधूक!

१९ टक्क्यांनी कमी झाले लसीकरण

पहिल्या दिवशी जिलह्यात ७९.३३ टक्के कोविड लसीकरण झाले होते. त्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० टक्के लसीकरणाला प्रतिसाद मिळाला होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर १९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी मात्र केवळ ६०.३३ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालयातील लसीकरण ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. १९ जानेवारी रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ ४० टक्के लाभार्थींनी लस घेतल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले.

घाबरू नका, लसीकरण सुरक्षीत

कुठलीही लस घेतल्यावर त्याचे काही परिणाम दिसून येतात. ताप येणे, अंग दुखणे ही लक्षणे लसीकरणानंतर येणे साहजिक असून ती सर्वांमध्येच जाणवत नाहीत. आतापर्यंत ज्यांनी लस गेतली, त्यापैकी केवळ पाच ते दहा टक्के लोकांमध्ये या प्रकारची लक्षणे दिसून आले. त्यामळे लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गजर नाही, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे लसीकरणाची स्थिती

दिवस - झालेले लसीकरण (टक्क्यांमध्ये )

१६ जानेवारी - ७९.३३

१९ जानेवारी - ६०.३३

लसीकरणानंतर रिॲक्शन येणे हे साहजिक आहे. कुठल्याही लसीकरण मोहिमेप्रमाणे कोविड लसीकरणात पाच ते दहा टक्के लोकांमध्येच या प्रकारची रिॲक्शन दिसून येते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कोविड लसीकरण सुरक्षित आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण

Web Title: Excitement for the first day