उत्पादन शुल्क विभागाची आठ गावांतील दारू अड्ड्यांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:20+5:302021-05-12T04:19:20+5:30

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या ...

Excise department raids liquor dens in eight villages | उत्पादन शुल्क विभागाची आठ गावांतील दारू अड्ड्यांवर छापेमारी

उत्पादन शुल्क विभागाची आठ गावांतील दारू अड्ड्यांवर छापेमारी

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या निर्मिती करणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. आठ गावातील दारू अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली असून या ठिकाणावरील १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या निर्मिती करणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाई साठी ७ ते ११ मे या कालावधीत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत अकोट, पोपटखेड, जनुना, आगर, नवथळ, भिकूनखेड, बाळापुर,वल्लभनगर या गावांमध्ये अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर धाड टाकण्यात आली. या आठ गावांतील धर्मेंद्र दशरथ शिरसाट, भारत उत्तम शिरसाट, राजू दशरथ शिरसाट, संतोष पातोडे, वासुदेव सुखदेव पाटील, संतोष गोपाल अवचार, शालिग्राम मनीराम पवार, ज्योतीराम साकलाल चव्हाण, अर्चना संजय राठोड, नंदकिशोर सुरेश नाईक या १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून सुमारे ३ हजार ४३० लिटर मोहा सडवा नष्ट करण्यात आला आहे, तर ९२४ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली आहे. एक दुचाकी जप्त करण्यात आली असून, दहा लिटर बिअर साठा ताब्यात घेण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण पाच लाख रुपयांचा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून नष्ट केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद काळे, डी. के. क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक संजय देशमुख, आर. एम. ठोंबरे, डी. ओ कुटेमाटे, डी. एस. वाघ, आयेशा लांबट, धर्मेंद्र त्रिपाठी, जयंत शेगोकार, संतोष सोनोणे, सोमेश जाधव, घाटे, कोमल शिंदे, अमर इंगळे यांनी केली.

Web Title: Excise department raids liquor dens in eight villages