विधानसभा निवडणुकीतील ‘कामगिरी’चे उत्खनन!

By Admin | Updated: November 17, 2014 01:39 IST2014-11-17T01:39:51+5:302014-11-17T01:39:51+5:30

शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मागितली माहिती; बुथनिहाय मिळालेल्या मतांची समीक्षा होणार.

Excavation of the 'performance' of assembly elections! | विधानसभा निवडणुकीतील ‘कामगिरी’चे उत्खनन!

विधानसभा निवडणुकीतील ‘कामगिरी’चे उत्खनन!

अकोला: विधानसभा निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या पराभवाचे उत्खनन सुरू झाले आहे. बुथनिहाय मिळालेल्या मतांची माहिती शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मागितली आहे. निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. गत २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपची युती यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून तुटली होती. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, बाळापूर आणि आकोट मतदारसंघात शिवसेना-भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रचंड रस्सीखेच झाली होती. अकोला पूर्व आणि आकोट मतदारसंघात झालेली रस्सीखेच तर थेट ह्यमातोश्रीह्णपर्यंत पोहोचली होती. निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. केवळ अकोला पूर्व मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर चार मतदारसंघातील उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. पराभवावर चिंतन करण्यासाठी गत आठवड्यात शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. ऐनवेळी शिवसेना-भाजप युती तुटल्याने प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता. काही ठिकाणी रिंगणात उमेदवारही नवीनच होते. तसेच जनतेमध्येही संभ्रम होता, त्यामुळे पराभव झाल्याचे काही पदाधिकार्‍यांनी सांगितले होते. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या पराभवाची शिवसेना पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, उमेदवारांना बुथनिहाय मिळालेल्या मतांची माहिती मागितली आहे. ही माहिती शिवसेना भवनात सादर करावी लागणार आहे. ही माहिती शिवसेनेचे पदाधिकारी सोमवारी सादर करणार असल्याचे समजते.

Web Title: Excavation of the 'performance' of assembly elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.