विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:26 IST2019-12-17T12:25:56+5:302019-12-17T12:26:03+5:30
समितीने वैद्यकीय महाविद्यालायातील कर्मचारी संख्या, खाटांची संख्या, तसेच इमारतीची पाहणी केली.

विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी
अकोला : वैद्यकीय विद्यापीठ, नाशिक अंतर्गत लोकल इन्फेक्शन समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी समितीने महाविद्यालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाच्या धर्तीवर विद्यापीठांतर्गत लोकल इन्फेक्शन समिती कार्यरत असून, या समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी समितीने वैद्यकीय महाविद्यालायातील कर्मचारी संख्या, खाटांची संख्या, तसेच इमारतीची पाहणी केली. समितीमध्ये नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मस्के, डॉ. बोरखे होते. विशेष म्हणजे आठवडाभरात ‘एमसीआय’ची समिती आठवडाभरात सर्वोपचार रुग्णालयाला भेट देणार आहे.