माजी आमदार पुत्राविरूद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 17, 2014 01:12 IST2014-07-17T01:01:45+5:302014-07-17T01:12:08+5:30
एका युवकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी माजी आमदार राजगुरू यांच्या मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा.

माजी आमदार पुत्राविरूद्ध गुन्हा
वाशिम : एका युवकाला तोंडावर फायटर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी माजी आमदार राजगुरू यांच्या थोरल्या मुलासह दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना चिखली सुर्वे मार्गावर १५ जुलै रोजी रात्री ११:३0 वाजताच्या सुमारास घडली.
पोलिस शिपाई संतोष सुंदरसिंग राठोड यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, चिखली येथून वाशिमकडे मी व माझा मित्र येत असताना माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरू यांचा मोठा मुलगा व त्याचा एक मित्र याने मोटारसायकल अडवून मारहाण केली. या मारहाणीमध्ये मित्राच्या तोंडावर दोघांनी मिळून फायटर मारले. यामध्ये मित्राला गंभीर दुखापत झाली. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.