आकोटात भरदिवसा घरफोडी

By Admin | Updated: November 23, 2014 01:23 IST2014-11-23T01:23:07+5:302014-11-23T01:23:07+5:30

८ हजार ५00 रु पयांचा ऐवज लंपास.

Everyday life burglary | आकोटात भरदिवसा घरफोडी

आकोटात भरदिवसा घरफोडी

आकोट (अकोला): स्थानिक डोहरपुरा शिवदास कॉलनीमध्ये घरफोडी करून ८ हजार ५00 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन हरिभाऊ को थळकर हे आपल्या कुटुंबासह घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने भिंत फोडून घरात प्रवेश केला. घरात असलेल्या लोखंडी कपाटातून ७ हजार ५00 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख १ हजार रुपये, असा एकूण ८ हजार ५00 रु पयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी तपासाअंती आरोपी पंकज जनार्दन विजेकर डोहरपुरा याच्याविरुद्ध भादंवि ४५४, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आकोट शहर पोलिसांनी दिली. अलीकडच्या काळात आकोट शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस प्रशासन दक्ष झाले असून ठिकठिकाणी गस्त घातल्या जात आहे.

Web Title: Everyday life burglary