मोरयाच्या जयघोषाने ‘ती’च्या गणपतीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:37 IST2017-08-26T01:37:09+5:302017-08-26T01:37:27+5:30
गणपती बाप्पा मोरया म्हणणे आता ‘ती’चा मान पाहिला.. या संकल्पनेने लोकमत सखी मंचतर्फे ‘ती’च्या गणपतीची स्थापना करण्यात आली. स्त्रीशक्तीचा जागर करीत संकल्प प्रतिष्ठान महिला ढोल पथकाच्या आसमंत दुमदुमणार्या ढोल वादनाने ‘ती’च्या गणपतीचे स्वागत करण्यात आले.

मोरयाच्या जयघोषाने ‘ती’च्या गणपतीची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गणपती बाप्पा मोरया म्हणणे आता ‘ती’चा मान पाहिला.. या संकल्पनेने लोकमत सखी मंचतर्फे ‘ती’च्या गणपतीची स्थापना करण्यात आली.
स्त्रीशक्तीचा जागर करीत संकल्प प्रतिष्ठान महिला ढोल पथकाच्या आसमंत दुमदुमणार्या ढोल वादनाने ‘ती’च्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. लोकमततर्फे या गणेश चतुर्थीपासून ‘ती’ बदलणार ही परंपरा.., ‘ती’ देणार गणरायाला रूप.., तीच करणार प्रतिष्ठापना अन् तीच करणार गणरायाची प्रार्थना. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकमत शहर कार्यालयात सकाळी सखी मंच विभागप्रमुख व सदस्यांच्या उपस्थितीत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी जयश्री गुळाखे यांच्या हस्ते गणेश स्थापनेचा विधी करण्यात आली.
पुढील चार दिवस महिलांच्या हस्ते ‘ती’च्या गणपतीला विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांनी ढोल पथकाच्या तालावर ठेका घेत फुगडीचा आनंद घेतला तरी सर्व महिलांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपतीला पुढील पाच दिवस जास्तीत जास्त महिलांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.