पातूर शहरात १७ सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना

By Admin | Updated: September 2, 2014 19:38 IST2014-09-02T19:38:57+5:302014-09-02T19:38:57+5:30

पातूर पोलिस स्टेशनअंतर्गत पातूर शहरात १७ सार्वजनिक गणेश मंडळांची व ग्रामीण भागात ९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

Establishment of Ganesh in 17 public assemblies in the city of Paturur | पातूर शहरात १७ सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना

पातूर शहरात १७ सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना

पातूर: पातूर पोलिस स्टेशनअंतर्गत पातूर शहरात १७ सार्वजनिक गणेश मंडळांची व ग्रामीण भागात ९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे २५ गावांमध्ये ह्यएक गाव एक गणपतीह्ण संकल्पना राबविण्यात आली असून, पातूर शहरात १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. तर ८ खासगी मंडळांद्वारे ह्यश्रींह्णची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात यावर्षी एकूण ६७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ह्यबाप्पांह्णची स्थापना केली असून, २५ गावांमध्ये ह्यएक गाव एक गणपतीह्ण ही संकल्पना राबविण्यात आली. पातूर पोलिस स्टेशनअंतर्गत माझोड, अंबाशी, नांदखेड, आस्टूल, कोठारी बु., कापशी तलाव, माळराजुरा, भानोस, कोसगाव, पाचरण, बेलुरा खुर्द, सावरखेड, हिंगणा, दिग्रस खुर्द, चिंचखेड, धोधानी, गोंधळवाडी, बेलतळा, भंडारज खुर्द, मलकापूर, शेकापूर, खापरखेड, रामनगर, आसोला, सस्ती या गावांमध्ये प्रत्येकी एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

Web Title: Establishment of Ganesh in 17 public assemblies in the city of Paturur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.