६५ गावांमध्ये होणार आपत्ती निवारण समित्या गठित

By Admin | Updated: May 11, 2015 02:31 IST2015-05-11T02:31:19+5:302015-05-11T02:31:19+5:30

अकोला जिल्ह्यात ६५ पूरप्रवण गावे.

Establishment of disaster relief committees will be set up in 65 villages | ६५ गावांमध्ये होणार आपत्ती निवारण समित्या गठित

६५ गावांमध्ये होणार आपत्ती निवारण समित्या गठित

अकोला: जिल्ह्यातील पूरप्रवण ६५ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, गाव पातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या गठित करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात अतवृष्टी व पुरामुळे बाधित होणारी जिल्ह्यात ६५ गावे आहेत. त्यामध्ये अकोला १२, बाश्रीटाकळी ८, आकोट ९, तेल्हारा ८, बाळापूर ८, पातूर १0 व मूर्तिजापूर तालुक्यातील १0 गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यास गावातील घरांचे नुकसान होते. या पृष्ठभूमीवर पुरामुळे बाधित होणार्‍या या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित पूरप्रवण ६५ गावांमध्ये ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या गठित करून, समित्यांमार्फत करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकरी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना दिले आहेत.

Web Title: Establishment of disaster relief committees will be set up in 65 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.