तपासातील त्रुटी लाचखोरांच्या पथ्यावर
By Admin | Updated: September 21, 2014 22:53 IST2014-09-21T22:53:27+5:302014-09-21T22:53:27+5:30
५४ जणांना शिक्षा : १२३ प्रकरणांमधील आरोपी निर्दोष.

तपासातील त्रुटी लाचखोरांच्या पथ्यावर
अकोला : लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा लाचखोरांच्या प थ्यावर पडत असल्याचे चित्र शिक्षेच्या अल्प प्रमाणावरून पहावयास मिळते. चालू वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण १७७ खटले चालविण्यात आले. त्यापैकी केवळ ५४ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, १२३ खटल्यांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
शासकीय-निमशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर कारवाईच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आहे. अलिकडच्या काळात या विभागाने धडाक्यात कारवाया केल्या.मात्र भ्रष्ट अधिकार्यांवर कारवाई केल्यानंतर, तपासातील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा आरोपींसाठी फायद्याच्या ठरत आहे.
लाचखोरीच्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांची परवानगी आवश्यक असते. वरिष्ठ अधिकारी तपासामध्ये त्रुटी असल्यास दुरुस्त करता त. प्रसंगी विधी विभागाचा सल्लाही घेतात. नंतरच दोषारोपपत्र दाखल करण्यास वरिष्ठांकडून मंजुरी दिली जाते. लाचखोरांसाठी सापळा रचताना शासकीय कर्मचार्यांना पंच म्हणून सोबत घेतले जाते. न्यायालयात पंच फितूर होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. तरी लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
परिक्षेत्र शिक्षेची टक्केवारी
मुंबई ११%
ठाणे 0६ %
पूणे 0२%
नाशिक 1२%
नागपूर 0९%
अमरावती 0३%
औरंगाबाद 0८%
नांदेड 0३%