अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमणाचा सफाया
By Admin | Updated: July 10, 2014 01:27 IST2014-07-10T01:25:11+5:302014-07-10T01:27:59+5:30
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत कॅँ टीन धाराशायी केली.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमणाचा सफाया
अकोला : मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत कॅँ टीन धाराशायी केली. तसेच खदान परिसरातील अ ितक्रमकांजवळून दंड वसूल करण्याची कारवाई बुधवारी केली.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडल्याचा दाखला देत, पोलिस प्रशासनाने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा व्यवस्था देण्यास तूर्तास नकार दिला; परंतु मनपा प्रशासन मात्र अतिक्रमकांना हुसकावण्याच्या मुद्यावर ठाम आहे. बुधवारी मनपाची अर्थसंकल्पीय सभा असतानादेखील, अतिक्र मण दूर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.
त्यानुषंगाने अतिक्रमण निर्मूलन पथकाने खदान पोलिस ठाणे ते सरकारी गोडावून पर्यंत रस्त्यालगतच्या अतिक्रमकांना हुसकावून लावले. सरकारी गोडावूनजवळील आखरे नामक अतिक्रमकाला १ लाखाचा दंड आकारला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमित कॅँ टीन जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.