राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे संघाची बरोबरी

By Admin | Updated: December 22, 2014 00:34 IST2014-12-22T00:34:53+5:302014-12-22T00:34:53+5:30

१९ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा.

Equivalent to the Kolhapur and Pune teams in the state-level school weightlifting competition | राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे संघाची बरोबरी

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे संघाची बरोबरी

नीलिमा शिंगणे/ अकोला: येथील वसंत देसाई क्रीडांगणावर रविवारी पार पडलेल्या १९ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे विभाग संघाच्या खेळाडूंनी गुणानुक्रमे बरोबरी साधली. दोन्ही संघाने मुले व मुलींच्या गटात प्रत्येकी ११ पदकांची कमाई केली. मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने ८ तर मुलींच्या गटात ३ पदक मिळविली. पुणे संघाने मुलांच्या गटात ६ तर मुलींच्या गटात ५ पदके पटकाविले.
शनिवारी सायंकाळी झालेल्या मुलींच्या गटातील अंतिम फेरीमध्ये ६९ किलो वजनगटात कोल्हापूरच्या मयूरी देवरे हिने पुण्याच्या शरयू काळे हिच्यावर मात केली. नाशिकची करुणा गाढे तृतीय स्थानावर राहिली. ७५ किलो वजनगटात क्रीडापीठाची किरण जोतवाणी हिने प्रथम स्थान पटकाविले. नाशिकची ऋतुजा अहिरे द्वितीय आणि पुण्याची सोनल कानडे तिसर्‍या स्थानावर राहिली. ७५ किलोच्या वर वजनगटात नाशिकच्या रेणुका नलावडे हिने कोल्हापूरच्या अश्‍विनी मलगेचा पराभव केला. मुंबईच्या आशिका भोईर तृतीय स्थानावर राहिली.
मुलांच्या गटातील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अंतिम फेरीत ८५ किलो वजनगटात कोल्हापूरचा घनश्याम देसाई याने लातूरच्या हरजिंदरसिंग जगतसिंग गाडीवाले याचा पराभव केला. पुण्याचा समाधान माने याने तिसरे स्थान मिळविले. ९४ किलो वजनगटात पुण्याच्या राजू आसवले याने प्रथम, कोल्हापूरचा विनायक हजारे द्वितीय आणि अमरावतीचा अक्षय उदेकर तृतीय ठरला. १0५ किलो वजनगटात पुणे विभागाचा महादेव जाधव प्रथम, कोल्हापूरचा प्रथमेश पावसकर द्वितीय आणि मुंबईचा भावेश कोणकर तिसर्‍या स्थानावर राहिला. १0५ किलोच्या वर वजनगटात मुंबईचा शुभम कुमावत याने प्रथम क्रमांक पटकाविला. कोल्हापूरचा अर्जुन मलगे याने दुसरा क्रमांक मिळविला. नागपूरचा देवाशिष जयपूरकर याने तिसरा क्रमांक मिळविला.

Web Title: Equivalent to the Kolhapur and Pune teams in the state-level school weightlifting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.