शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेचा गुंता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:03 IST

राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणच्या ११ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेसाठी आता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.

- संतोष येलकरअकोला : राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असला, तरी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणच्या ११ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेसाठी आता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेचा गुंता सुटेनासा झाला आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गतवर्षी करण्यात आलेल्या वाळू घाटांच्या लिलावाची मुदत गत ३१ सप्टेंबर रोजी संपली. त्यामुळे २०१८-१९ या वर्षात वाळू घाटांचा आॅनलाइन लिलाव करण्याची तयारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या खनिकर्म विभागामार्फत सुरू करण्यात आली असताना, वाळू घाटांचा लिलाव करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गत आॅक्टोबरमध्ये स्थगिती दिली होती. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्यास हरकत नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावावरील स्थगिती उठविण्यात आल्यानंतर, गौण खनिज उत्खननासंदर्भात पर्यावरण मान्यतेसाठी केंद्र शासनाच्या १५ जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेस पुढील अधिसूचना प्रसिद्ध हाईपर्यंत निलंबित करण्यास येत असल्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणमार्फत देण्यात आला. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण मान्यतेसाठी राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत १५ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना देण्यात आला. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावांसाठी पर्यावरण मान्यतेकरिता आता राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या खनिकर्म विभागांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत.दोन वर्षांपासून जिल्हा पर्यावरण समितीची घेण्यात येत होती मान्यता!शासनाच्या वाळू धोरणानुसार गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण मान्यता घेण्याकरिता जिल्हास्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करून मान्यता घेण्यात येत होती. दोन वर्षांसाठी वाळू घाटांच्या लिलावांसाठी पर्यावरण मान्यतेकरिता जिल्हा स्तरावरून राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येत होते. 

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण मान्यतेकरिता वाळू घाटांचे प्रस्ताव राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे सादर करण्यात येतील.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळूriverनदी