विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपुरक मूर्ती

By Admin | Updated: August 30, 2014 01:12 IST2014-08-30T01:12:09+5:302014-08-30T01:12:09+5:30

विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपुरक शाडू मातीच्या ४0 गणेशमूर्ती निर्माण केल्या.

Environmental idol created by students | विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपुरक मूर्ती

विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपुरक मूर्ती

अकोला : श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय, व्याळा येथील सातपुडा इको क्लबच्या हरितसेना व स्काऊटस् सदस्यांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपुरक शाडू मातीच्या ४0 गणेशमूर्ती निर्माण केल्या. गत सात वर्षांपासून शाळेमध्ये विद्यार्थी मूर्ती तयार करीत असून, आजपर्यंत साधारणत: ५00 गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी निर्माण करून स्थापना केली.
राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक यांना सामाजिक वनीकरण विभागाने एका कार्यशाळेत प्रस्तुत विषयाचे प्रशिक्षण दिले होते. याच माध्यमाने त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालय, बचतगट, यांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीचे कौशल्य शिकविले. या उपक्रमाचे कौतुक संस्था प्रमुखांनी केले. मुख्याध्यापक भगवान मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून प्लॅस्टर ऑफ पॅरीस व रासायनिक रंगामुळे होणारे प्रदूषण थांबवून निसर्ग स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. शालेय विद्यार्थ्यांंनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Web Title: Environmental idol created by students