पर्यावरणाचा ऱ्हास मनुष्यास हानिकारक - उपवन संरक्षक एस.बी.वळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:30 IST2019-04-01T13:30:11+5:302019-04-01T13:30:57+5:30
अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले.

पर्यावरणाचा ऱ्हास मनुष्यास हानिकारक - उपवन संरक्षक एस.बी.वळवी
अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष
संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले. शिवतेज प्रतिष्ठान अकोलाचे वतीने आयोजित पक्षांकरीता पाणी पात्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. शिवतेज प्रतिष्ठानच्यावतीने नेहरू पार्क मधिल योग वर्गात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला
अध्यक्षपदी योग गुरू मनोहरराव इंगळे होते. त्यांनी शरीरातील इंद्रीयांना आपण जशा सवयी लाऊ त्या सवयीवर जीवन रथ चालतो. त्यावर शरीरातील पंचमहाभूते काम करतात. तसेच निसगार्तील पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे माणसाने माणसासोबत व प्राणीमात्रांसोबत माणूसकीने वागणे हाच खरा धर्म आहे असेही ते बोलले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जसवंतसिंग मल्ली,घन:श्याम गांधी, रेवलनाथ जाधव शिवतेज इंगळे,अनुराधा इंगळे,वंदना तायडे,इंदूताई देशमुख,मोनिका बालचंदानी यांनी परिश्रम घेतलेत.
कार्यक्रमाला आप्पासाहेब देशमुख, बि.एस.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. पाहूण्यांचा परिचय माजी वन अधिकारी बी.यू.इंगळे यांनी करून दिला. प्रास्ताविक वामनराव चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन स्मिता दुबे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब काळे
यांनी मानले