शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तर उद्योजक देशोधडीला लागतील!

By admin | Updated: May 6, 2016 02:21 IST

औद्योगिक महामंडळाचा नियोजनशून्य कारभार: मोठे उद्योजक अनुत्सुक.

राम देशपांडे /अकोलादरवर्षी निर्माण होणार्‍या आवर्षणाच्या स्थितीवर मात करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने कुठल्याच कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील अर्धेअधिक उद्योग बंद पडले असून, तग धरून असलेले उर्वरित उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठय़ा प्रमाणात भागभांडवल गुंतविलेले उद्योजक देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मोठे उद्योग या भागात येण्यास अनुत्सुक असल्याचे मत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल व उपाध्यक्ष उन्मेष मालू यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील १ हजार १७५ उद्योगांपैकी ५९२ उद्योग गतकाळात पाण्याअभावी बंद पडले आहेत. दिवसाला किमान १५ हजार लिटर पाण्याची मागणी असलेल्या उर्वरित ६00 उद्योगांचा पाणीपुरवठा ७ हजार ५00 लिटरवर येऊन ठेपला असताना, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी अधिग्रहित विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला आहे. नियोजनशून्य अधिकार्‍यांनी तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आरंभला असल्याचा घणाघाती आरोप ह्यलोकमतह्णशी बोलताना अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला. या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले की, आजतागायत अनेकदा अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास औद्योगिक विकास महामंडळ असर्मथ ठरले आहे. महान धरणातील पाणी खांबोरा प्रकल्पात घेऊन ते उद्योगांना पुरविले जात होते; मात्र महान धरणातील पाणीसाठा आरक्षित करून थेट पाइप लाइनद्वारे तो एमआयडीला देता आला असता. ज्याप्रमाणे ७0 कि.मी. लांब असलेल्या अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा केला जातो, त्याचप्रमाणे वान प्रकल्पातील पाणी थेट पाइप लाइनद्वारे अकोल्यापर्यंत आणता आले असते. हे अंतर ७0 कि.मी. पेक्षाही कमी आहे.