पाणी चोरण्यात उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर आघाडीवर!
By Admin | Updated: August 14, 2014 02:02 IST2014-08-14T01:40:29+5:302014-08-14T02:02:49+5:30
अकोला मनपाचा मोर्चा ‘क्रिम एरिया’तील रहिवाशांकडे वळला असून २.५१ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.

पाणी चोरण्यात उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर आघाडीवर!
अकोला : अवैध नळ जोडणीच्या माध्यमातून पाण्याची चोरी करणार्या स्लम एरियातील नागरिकांविरोधात फौजदारी दाखल केल्यानंतर मनपा प्रशासनाचा मोर्चा आता ह्यक्रिम एरियाह्णतील रहिवाशांकडे वळला. गोरक्षण रोड परिसरातील उद्योजक, व्यावसायिक व डॉक्टरांच्या निवासस्थानी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अवैध नळ शोध मोहीम राबवली असता, उच्चभ्रू व आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे सुशिक्षित नागरिकसुद्धा पाण्याची सर्रास चोरी करीत असल्याचे बुधवारी कारवाईदरम्यान समोर आले. या प्रकरणी ३३ अवैध नळ जोडण्या तोडण्यात आल्या असून पाण्याची चोरी करणार्यांना २ लाख ५१ हजार २00 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.
अवैध नळ जोडणीच्या माध्यमातून महापालिकेच्या पाण्यावर डल्ला मारणार्या नागरिकांविरोधात प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी इराणी झोपडपट्टी, जुने शहरातील स्लम एरियात अवैध नळ जोडणीप्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली होती.
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्या नागरिकांची निकड लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु शहरातील मोठे उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर यांची दुकाने, हॉस्पिटलसह निवासस्थानी मोठय़ा प्रमाणावर पाण्याची चोरी केली जात असल्याचा मुद्दा ह्यलोकमतह्णने सतत उपस्थित केला. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाचा रोख आता ह्यक्रिम एरियाह्णतील रहिवाशांवर केंद्रित झाला आहे. जलप्रदाय विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्स येथे ४ अवैध नळ जोडण्या, बालाजीनगरस्थित ठाकूर अपार्टमेंट मधील १0, रामलता बिजनेस सेंटरमागील गुरुगणेश रेसीडेंसी येथे १0 अवैध नळ जोडण्या शोधून काढल्या. याप्रमाणेच हुतात्मा स्मारकजवळील दूरसंचार विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या निवासस्थानातील ४, उटांगळे मंगल कार्यालयातील एक तसेच सिंधी कॅम्पस्थित राधास्वामी अपार्टमेंटमधील ४ अवैध नळ जोडण्या थेट तोडण्यात आल्या. संबंधित नागरिकांना २ लाख ५१ हजारांचा दंड बजावला असता यापैकी ५९ हजार ४00 रुपये तत्काळ वसूल करण्यात आले. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कठोर पावलेउचलली असून एकीकडे मनपाच्या पाण्याची चोरी करायची, अन् दुसरीकडे मनपा प्रशासन मूलभूत सुविधा पुरवित नसल्याची ओरड करायची, हा दुटप्पीपणा चालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उच्चभ्रू, सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या संपन्न असणार्या सभ्य नागरिकांकडून ही अपेक्षा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.