पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:07 PM2019-07-08T15:07:12+5:302019-07-08T15:09:56+5:30

पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे.

The enthusiasm in Congress even after the defeat | पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

Next
ठळक मुद्देअकोला पश्चिममध्ये सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज काँग्रेसकडे आले आहेत.काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अकोला: अकोला जिल्ह्यात भाजापाने निर्माण केलेल्या झंझावातापुढे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला उभारी मिळण्याची एकही संधी मिळत नाही. लोकसभेसह विधानसभेत सातत्याने काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अपेक्षित यश मिळण्याऐवजी आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तिकीट मिळविण्यासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात उतरले आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना देवडिया काँग्रेस भवनातून ५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित अर्ज आवश्यक दस्तावेज व १५ हजार रुपये शुल्कासह प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील कार्यालयात जमा करायचे आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असताना विधानसभा निवडणुकीसाठी फारसे कुणी इच्छुक असणार नाहीत, अशी शक्यता वाटत होती; मात्र जय-पराजयाची पर्वा न करता काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे.
राष्टÑवादीकडे असलेल्या अकोला पश्चिममध्ये सर्वाधिक दावेदारी
अकोला पश्चिम व मूर्तिजापूर हे दोन मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. आताही या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाही काँग्रेसच्या इच्छुकांनी या मतदारसंघांसाठीही पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांची गर्दी आहे. अकोला पश्चिममध्ये सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज काँग्रेसकडे आले आहेत.
 
अल्पसंख्याकांची मोट बांधण्यासाठी मोर्चेबांधणी
विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी विविध राजकीय पक्षांकडून अल्पसंख्याक मतदारांची मोट बांधाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोल्यात राष्ट्रीय स्तरावरील अल्पसंख्याक मेळाव्यासाठी तर सपातर्फे १४ जुलै रोजी आमदार अबू आझमी यांची सभा घेण्याबाबत प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.
बॉक्स....
अकोला पूर्व-०३
मूर्तिजापूर-०३
अकोट-१०
बाळापूर-१२
अकोला पश्चिम-१३

 

Web Title: The enthusiasm in Congress even after the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.