तिस-या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचा समारोप उत्साहात
By Admin | Updated: December 14, 2015 02:43 IST2015-12-14T02:43:08+5:302015-12-14T02:43:08+5:30
तीन दिवस झाले राष्ट्रसंतांच्या विचारांचे मंथन.

तिस-या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचा समारोप उत्साहात
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तिसर्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. तीन दिवसांच्या विचार साहित्य संमेलनात विविध वक्त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांवर मंथन करून उपस्थितांपर्यंंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित तिसर्या राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव विघे गुरुजी यांची, तर प्रमुख वक्ते म्हणून आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांची उपस्थिती होती. यावेळी आमले महाराज, अँड. रामसिंग राजपूत, श्रीकृष्ण ठोंबरे, रामेश्वर बरघट, महादेवराव भुईभार, नंदकिशोर पाटील, आगळे गुरुजी, अँड. वंदन कोहाळे, डॉ. प्रकाश मानकर, अँड. संतोष भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंतांचे विचार आजच्या युवकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनात विविध वक्त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर मंथन केले. दरम्यान, चिमुकल्यांनी राष्ट्रसंतांच्या भजन कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या तीन दिवसीय संमेलनाची सकाळ सामुदायिक ध्यान, योग साधनेने उजाडली. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर बरघट यांनी, सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी, तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.