पातूर तालुक्यातील हळद जाणार इंग्लडला!

By Admin | Updated: December 13, 2014 00:00 IST2014-12-13T00:00:39+5:302014-12-13T00:00:39+5:30

५00 टन होणार निर्यात; करार प्रक्रिया प्रारंभ.

England will go to Turmeric turmeric | पातूर तालुक्यातील हळद जाणार इंग्लडला!

पातूर तालुक्यातील हळद जाणार इंग्लडला!

राजरत्न सिरसाट/अकोला
स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीसोबतच नवीन प्रयोगही करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी तीनशे हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. या हळदीत कुरकमीनचे प्रमाण अधिक असल्याने दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ही हळद खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी इंग्लड येथील कंपनीशी कराराची प्रक्रिया सुरू झाली असुन, या कराराद्वारे पातूरची पाचशे टन हळद आता थेट इंग्लडला निर्यात होणार आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प कार्यक्रमातंर्गत राज्यात शेतकर्‍यांचे गट आणि उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत जवळपास शंभर कंपन्या स्थापन होण्याच्या मार्गावरू न असून, पंधराहून अधिक कंपन्या बुलडाणा जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी पारंपरिक पिकांसह, पिकांचे काही नवीन प्रयोगही करीत आहेत. अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बटाटा, ढोबळी मिरची, बेबी कॉर्न, कसुरी मेथी, टरबूज आदी पिकांवर लक्ष केंद्रित केले असून, हा शेतमाल थेट कंपन्यांना विकला जात आहे. त्यासाठी करार करण्यात आल्याने या कंपन्या थेट शेतात येऊन शेतमाल खरेदी करीत आहेत. याच पद्धतीचा प्रयोग पातूर तालुक्यातील हळद उत्पादक शेतकर्‍यांनी केला आहे. या तालुक्यात जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावर सेलम जातीच्या हळदीची लागवड करण्यात आली आहे. या हळदीमध्ये कुरकमीनचे प्रमाण अधिक आहे. मसाल्यासाठी उपयुक्त घटक आणि इतर आरोग्यदायी, औषधी गुणधर्मही हळदीमध्ये आहेत. म्हणूनच इंग्लडच्या एका कंपनीने टरफलाच्या हळदीची मागणी केली आहे. पातूरच्या शेतकरी गटाच्या श्रमिक भारती अँग्रोप्रोड्युस कंपनीने हळदीची निर्यात करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यासाठी करार प्रक्रियाही प्रारंभ केली आहे. निर्यातीसाठी या कंपनीने हळद मळणी यंत्र लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच ही यंत्रणा सुरू केली जाणार आहे.

*हेक्टरी अडीचशे क्विंटल उत्पादन
ओल्या हळदीचे उत्पादन हेक्टरी २५0 क्विंटल असून, वाळलेल्या हळदीचे हेक्टरी ६0 क्विंटल उत्पादन मिळते. या हळदीचे भाव राज्यातील बाजारपेठेत प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार पाचशेपर्यंत आहेत. आंतराष्ट्रीय कंपनी एकाच वेळी पाचशे टन हळद खरेदी करणार आहे.

Web Title: England will go to Turmeric turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.