लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील डाबकी रोड परिसरातील मोठ्या नाल्यांवर उभारलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. यामुळे मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेच्या वतीने शहरातील चारही झोनमध्ये प्रमुख रस्ते, मोठ्या नाल्यांवर धापे टाकून करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई राबवली जात आहे. रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमकांनी कब्जा केला असून, यामुळे मान्सूनपूर्व साफसफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे योग्यरीत्या साफसफाई न झाल्यास नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहते. नगरसेवकांच्या सूचना व तक्रारी लक्षात घेता पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या डाबकी रोड भागातील कॅनॉल रोड ते गजानन नगर, आश्रय नगरपर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पार पाडली.
जुने शहरातील अतिक्रमण काढले!
By admin | Updated: May 25, 2017 01:15 IST