अतिक्रमण थाटणा-यांना हुसकावले!

By Admin | Updated: October 28, 2014 01:03 IST2014-10-28T00:47:20+5:302014-10-28T01:03:35+5:30

धिंग्रा चौक ते रेल्वे स्थानक चौकपर्यंत कारवाई.

The encroachment took place! | अतिक्रमण थाटणा-यांना हुसकावले!

अतिक्रमण थाटणा-यांना हुसकावले!

अकोला : सणासुदीच्या दिवसांत शहरातील मुख्य रस्तेच अतिक्रमकांनी कवेत घेतल्याचे चित्र होते. सोमवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मदनलाल धिंग्रा चौक ते रेल्वे स् थानक चौकपर्यंंंतच्या टप्प्यातील अतिक्रमण थाटणार्‍यांना हुसकावून लावले. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याचे दिसून आले. सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत प्रचंड गर्दी असून, मुख्य रस्त्यालगत विविध साहित्यांची विक्री करणार्‍या अतिक्रमणधारकांनी ठिय्या मांडला आहे. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, रस्त्याने धड पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची सबब पुढे करीत अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात पडली होती. मात्र, सोमवारी प्रशासनाने मदनलाल धिंग्रा चौक ते थेट रेल्वे स्टेशन चौकपर्यंंंतच्या मार्गालगत लागमार्‍या हातगाड्यांवर थेट कारवाई करीत त्यांना हुसकावून लावले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The encroachment took place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.