सिटीबस स्टॉपवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:11+5:302021-02-05T06:19:11+5:30

वर्षभरानंतरही शहर बससेवा बंदच अकोला: महापालिका क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी शहर बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे गत ...

Encroachment at citybus stop | सिटीबस स्टॉपवर अतिक्रमण

सिटीबस स्टॉपवर अतिक्रमण

वर्षभरानंतरही शहर बससेवा बंदच

अकोला: महापालिका क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी शहर बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे गत वर्षभरापासून शहर बससेवा ठप्प पडली आहे. आता कोरोना काळातील सर्वच नियम शिथिल झाले असून, सर्वच वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे शहर बससेवाही सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वातावरणातील बदलाचा आरोग्याला फटका

अकोला : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकांना सर्दी, खोकला, घशात खवखवणे, हलका ताप येणे आदी आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी कुठल्याच लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Encroachment at citybus stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.