जवाद, मुद्दसीर व युसूफच्या खेळीने एमराल्ड विजेता

By Admin | Updated: August 11, 2015 22:18 IST2015-08-11T22:18:58+5:302015-08-11T22:18:58+5:30

अकोला येथे शालेय फुटबॉल स्पर्धा.

Emral Winners by Jawad, Mussahir and Yusuf | जवाद, मुद्दसीर व युसूफच्या खेळीने एमराल्ड विजेता

जवाद, मुद्दसीर व युसूफच्या खेळीने एमराल्ड विजेता

अकोला: लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर ग्रामीण क्षेत्र जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना सुफ्फा इंग्लिश स्कूल व एमराल्ड इंटरनॅशनल स्कूल संघात झाला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात एमराल्ड स्कूलने 0-१ असा विजय मिळवून, अकोला येथेच होणार्‍या विभागीय स्तर स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. १७ वर्षाआतील गटात मंगळवारी सामने झाले. स्पर्धेत २२ संघ सहभागी झाले होते. महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक फेरीतील सामने सकाळच्या सत्रात झाले. यामध्ये स्वामी विवेकानंद स्कूल, मुंगीलाल बाजोरिया विद्यालय, कुबा उर्दू स्कूल, एसओएस बिर्ला, मुस्लीम उर्दू स्कूल, पोदार स्कूल, उस्मान आझाद संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर शानदार विजय मिळवून, पुढील फेरी गाठली. उर्वरित सामने बुधवारी होतील. स्पर्धेत पंच म्हणून इम्रान खान, इलियास खान, नावेद, इरशाद खान, सईद खान, सईद नईम, अज्वाम कुरेशी, रहीम खान यांनी काम पाहिले. त्यांना सईद खान, क्रिष्णा, राजू उगवेकर,अजिंक्य धेवडे, प्रशांत खापरकर यांनी सहकार्य केले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, राज्य क्रीडा मार्गदर्शक दत्ता माने होते.

Web Title: Emral Winners by Jawad, Mussahir and Yusuf