सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा गुरूवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:35 IST2017-10-09T20:34:10+5:302017-10-09T20:35:09+5:30

अकोला: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना  नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार १२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा  बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम  गायकवाड मार्गदर्शन करतील. 

Employment Meet for educated unemployed Thursday | सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा गुरूवारी

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा गुरूवारी

ठळक मुद्देदोन नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधीमुद्रा बँक योजनेबाबतही मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना  नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. यासाठी जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरूवार १२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  अकोला येथे रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुद्रा  बँक योजनेविषयी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम  गायकवाड मार्गदर्शन करतील. 
या मेळाव्यामध्ये दोन नामांकित रेमण्ड लक्झरी कॉटन लि.  नांदगावपेठ(अमरावती) या कंपनीमध्ये १५0 पदे केवळ  पुरूषांची भरण्यात येत असून, त्यासाठी आयटीआयमधून दोन  वर्षाचा अभ्यासक्रम केलेला कोणताही ट्रेड, वयोर्मयादा १८ ते  २४ पर्यंत राहणार आहे. भारतीय जीवन विमा निगम अकोला ये थील ५0 पदे महिला व पुरूष आहेत. त्यासाठी पात्रता किमान  दहावी उत्तीर्ण आणि वयोर्मयादा १८ ते ३५ पर्यंत आहे. या  मेळाव्यामध्ये आस्थापनेचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार  आहेत. त्यांच्याकडील रिक्त पदांवर उमेदवारांची भरती  करण्यासाठी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र  उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्याच दिवशी निवड सुद्धा करण्या त येणार आहे. दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय  उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात रोजगाराची संधी आहे.  इच्छुकांनी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक  पात्रतेची मुळ कागदपत्रे सत्यप्रतीसह परिचयपत्र, दोन छायाचित्र  व सेवायोजन कार्डासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, र तनलाल प्लॉट येथे उपस्थित राहावे. अशी माहिती कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक  संचालक डी.एल. ठाकरे यांनी दिली. 

Web Title: Employment Meet for educated unemployed Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.