पारस विद्युत केंद्रातील कर्मचार्याची आत्महत्या
By Admin | Updated: August 3, 2014 00:36 IST2014-08-03T00:36:18+5:302014-08-03T00:36:18+5:30
कर्मचार्याने १ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

पारस विद्युत केंद्रातील कर्मचार्याची आत्महत्या
पारस: येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत समाधान संपत भगत (४७) नामक कर्मचार्याने १ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचे मूर्तिजापूर तालुक्यातील रोहणा येथील रहिवासी असलेले भगत हे विद्युत केंद्रातील ह्यसीएचपीह्ण विभागात तंत्रज्ञ-२ पदावर कार्यरत होते. पहाटे तीन वाजता त्यांनी पंप हाऊसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना समजताच कनिष्ठ सुरक्षा अधीक्षक के. एल. वाघोदे यांनी याबाबतची वर्दी बाळापूर पोलिसांना दिली. पारस चौकीच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भगत यांच्यावर १ ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.