शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प, कार्यालयांमध्ये शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:11 IST

अकोला: राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७,८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे.

ठळक मुद्देसंपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

अकोला: राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७,८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे. या संपातअकोला जिल्ह्यातील राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, उर्दू शिक्षक संघटना सहभाग झाल्या आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता.कार्यालयांमध्ये रिकाम्या खुर्च्या-टेबलसंपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी झाले. संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. अकोला शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्याने सर्वत्र शांतता होती. रिकाम्या खुर्च्या व टेबल असे चित्र बहुतांश सर्वच कार्यालयांमध्ये दिसून आले.

कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चासंपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सोमवारी अकोला शहरातून भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पुष्ठ्यर्थ जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहचल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.काय आहेत मागण्यासातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने करण्यात यावी, तसेच जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी व वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रकमेसह मंजूर करण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करण्यात याव्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करण्यात यावे, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचाºयांना आश्वासित योजनेचा लाभ देण्यात यावा.

टॅग्स :AkolaअकोलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलनStrikeसंप